अमरावती – आंध्रप्रदेशात कृष्णा जिल्ह्यात नुजीविडू गावानजिक एका अज्ञात वाहनाच्या धडकेने सहा अदिवासी ठार झाले असून अन्य आठ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. ठार झालेले सहा जण शेतमजुर म्हणून काम करीत होते.
मयत आदिवासी लायन तांडा या अदिवासी वस्तीवर रहात होते. हे सर्वजण एका रिक्षाने शेजारच्या गावात जात असताना त्यांच्या रिक्षाला दुसऱ्या एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्यात हे सहा जण जागीच ठार झाले. या घटनेबद्दल राज्यपाल विश्वभुषण हरिचंदन, उपमुख्यमंत्री ए. के. के. श्रीनिवास अदिंनी दु:ख व्यक्त केले आहे. जखमींना सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर त्वरीत उपचार करावेत व त्यांना लागेल ती वैद्यकीय मदत उपलब्ध करून द्यावी अशी सुचना उपमुख्यमंत्री श्रीनिवास यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना केली आहे.