आळंदी – आपला ब्रँड तयार करण्यासाठी कोण काय शक्कल लढवतील याचा नेम नाही. आळंदीत एका मेन्स पार्लरमध्ये सोन्याच्या वास्तऱ्याने दाढी केली जातीय. उदघाटनानंतर काही दिवसातच या पार्लरची चर्चा शहरभर सुरू आहे.
अविनाश बोरुंदीया यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत आळंदी येथे मेन्स पार्लर सुरू केले आहे. काहीतरी नवीन म्हणून त्यांनी दाढी करण्यासाठी सोन्याचा वस्तरा तयार करून घेतला आहे. हा वस्तरा 8 तोळे वजनाचा आहे. तसेच सोन्याच्या वस्तऱ्याने आणि साध्या वस्तऱ्याने दाढी करण्याचे दर वेगवेगळे ठेवण्यात आले आहेत. या विशेष पार्लरला आमदार गोपीचंद पडळकर यांनी शुक्रवारी (ता.12) भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
‘सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी करणे ही विशेष बाब आहे. यासाठी दरही कमी ठेवण्यात आले आहेत. केवळ 100 रुपयात हौशिंना त्यांची इच्छा पूर्ण करता येणार आहे. या नव्या कल्पनेला ग्राहकांचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे,’ असे रुबाब मेन्स पार्लरचे अविनाश बोरुंदीया यांनी सांगितले.