पुणे – तरूणावर शस्त्राने वार करून तीन वर्षांपासून फरार झालेल्या सराईताला स्वारगेट पोलिसांनी अटक केले. सिंकदर उर्फ चिकु समद्दीन शेख (वय ३१रा. डायसप्लॉट, गुलटेकडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
स्वारगेट तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय, सोमनाथ कांबळे , संदिप साळवे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी तीन वर्षांपासून फरार असलेला सराईत सिंकदर उर्फ चिकु गुलटेकडीतील एकोपा गार्डन परिसरात येणार असल्याची माहिती सोमनाथ कांबळे आणि संदीप साळवे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून सिंकदर उर्फ चिकुला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
त्याच्याविरूद्ध खंडणी, खुनाचा प्रयत्न, जबर दुखापत यासारखे गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी पोलीस उपायुक्त सागर पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर , पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाला तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय, सचिन कदम, विजय कुंभार, विजय खोमणे, सोमनाथ कांबळे, संदीप साळवे, लखन ढावरे, सचिन दळवी, ज्ञाना बडे, मनोज भोकरे, वैभव शीतकाल, शंकर गायकवाड, ऋषिकेश तिथमे यांच्या पथकाने केली.