digestive biscuits – पुष्कळ लोकांना सकाळी नाश्त्यामध्ये चहासोबत बिस्कीटे खाणे खूप आवडते. एखाद्या दिवस चहासोबत बिस्कीट नसल्यास काही लोकांचा दिवसच पूर्ण होत नाही. बऱ्याचदा आपण खास ‘डायजेस्टिव्ह बिस्कीट’ खरेदी करतो. या प्रकारच्या बिस्कीटांच्या जाहिराती नेहमी दाखवल्या जातात. या जाहिरातींमुळे आपण असा विचार करतो की, या बिस्कीटांत साखर, चरबी आणि सोडियम हे घटक नसतात किंवा कमी प्रमाणात असतात, यामुळे आपली भूकही शमेल आणि आरोग्य देखील चांगले राहील. मात्र, हे सगळेच सत्य नाही.
वास्तविक अशा बिस्किटांमध्ये साखर, चरबी, सोडियम आणि रिफाइंड पीठाचे प्रमाण जास्त असते. या बिस्किटांमध्ये चव वाढवणारी रसायने अर्थात टेस्ट इनहेंसर देखील टाकले जातात. परंतु, आपल्याला हे माहित आहे का की, ही डायजेस्टिव्ह बिस्कीटे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारकही ठरु शकतात. चला तर याचे दुष्परिणाम जाणून घेऊया…
1. ग्लूटेनचे प्रमाण जास्त –
सर्व बेकरी प्रोडक्ट मैद्यापासून बनवलेले असतात. मात्र, डायजेस्टिव्ह बिस्किटांमध्ये मैद्याऐवजी गव्हाचे पीठ वापरले जाते, असा दावा केला जातो. मात्र गव्हाच्या पिठामध्ये ग्लूटेन असते. प्रत्येक ब्रँडमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात ग्लूटेन वापरले जाते. ग्लूटेनचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने पोट दुखणे, गॅस, अतिसार आणि बद्धकोष्ठता या सारख्या समस्या उद्भवू शकते.
2. साखरेचा समावेश असतोच –
इतर बिस्किटांपेक्षा डायजेस्टिव्ह बिस्कीटे कमी गोड असतात. ही बिस्किटे साखरविरहित नसतात. या बिस्किटांत नैसर्गिक गोडव्यासह, साखर देखील वापरली जाते. जर या बिस्किटांमध्ये साखरेचे प्रमाण नियंत्रित पातळीपेक्षा जास्त असेल, तर लठ्ठपणा, मधुमेह, हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता वाढते
3.सोडियममुळेही वाढतात आजार –
अशा बिस्किटांची चव वाढवण्यासाठी आणि त्यांना हलके बनवण्यासाठी सोडियम घटक मिसळले जातात. जर, आपण जास्त सोडियमयुक्त बिस्किटे खात असाल, तर ते उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि स्ट्रोकसारख्या घातक रोगांना कारणीभूत ठरू शकते.
4. सॅच्युरेटेड फॅटमुळे हानी –
अशा बिस्किटांच्या पॅकेटवर चरबी रहित असल्याची नोंद असते. परंतु, त्यात सॅच्युरेटेड फॅट आणि इतर चरबीयुक्त पदार्थ पर्याय म्हणून वापरले जातात. जास्त सॅच्युरेटेड फॅट घेतल्यास कोलेस्टेरॉल आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल रोगांचा बळी पडण्याचा धोका देखील वाढतो.
5. प्रिजरवेटिव्हचा जास्त वापर –
बाजारातील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी या बिस्किटांप्रमाणेच या बिस्किटांमध्ये प्रीझर्वेटिव्हज टाकले जातात. यामुळे ते बर्याच दिवसांपर्यंत खराब न होता टिकून राहू शकतात. सुगंधासाठी या बिस्किटांमध्ये इसेंस देखील टाकले जातात. इसेंस एक असे रसायन आहे, जे आपल्या शरीराला कधी कधी हानिकारक ठरू शकते.