सना – दक्षिण येमेनमधील अदेन शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या स्फोटात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या 25 झाली आहे. तर 110 जण जखमी झाले आहेत. येमेनमध्ये नव्याने स्थापन झालेले मंत्रिमंडळ अदेनमध्ये आले असतानाच हा मोठा स्फोट झाला होता.
इराकचा पाठिंबा असलेल्या हौती बंडखोरांनी विमानतळावर चार बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली होती. त्यामुळे हा स्फोट झाल्याचे येमेनमधील आंतरराष्ट्रीय मंजूरी असलेल्या सरकारने म्हटले आहे. मात्र सरकारच्या या दाव्यावर बंडखोरांकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
या स्फोटात सरकारच्या विमानातील कोणीही जखमी झाले नाही. विमानाजवळ झालेल्या पहिल्या स्फोटानंतर लगेचच अदेन शहरातील राजवाड्याजवळ आणखी एक स्फोट झाला. विमानातून आलेले नव्या मंत्रिमंडळातील सदस्यांना याच राजवाड्यात नेण्यात आले होते. राजवाड्यावऱ् हल्ला करण्याच्या प्रयत्नातील एक ड्रोन नंतर सौदीने पाडले, असे सौदीच्या वृत्तवाहिनीने सांगितले.