पुणे – पेरणे फाटा येथील विजय दिनाच्या कार्यक्रमानिमित्त पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या पुणे-नगर रस्त्याने धावणाऱ्या बसेसच्या संचलनात बदल केले आहेत. या मार्गावरील बसेसचे संचलन 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून ते 1 जानेवारी रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
पुणे-नगर रस्त्यावर धावणाऱ्या मनपा भवन ते तळेगाव ढमढेरे (मार्ग क्र.159), वाघोली ते कारेगाव (मार्ग क्र.161), वाघोली ते न्हावी सांडस (मार्ग क्र. 147), वाघोली ते केंदूरगाव (मार्ग क्र. 162), वाघोली ते राहू (मार्ग क्र.137), वाघोली ते आळंदी (मार्ग क्र.257) या मार्गावरील बसेसचे संचलन बंद राहणार आहे. तर, मार्ग क्र. 159 बसेस मनपा भवन ते वाघोलीपर्यंत आणि मार्ग क्र. 161 बसेस पुणे स्टेशन ते वाघोलीपर्यंत धावणार आहे.
यासह चाकण-शिक्रापूर-चाकण मार्गावरील वाहतूकदेखील बंद ठेवण्याचे आदेश असल्याने पीएमपीची चाकण ते शिक्रापूर (मार्ग क्र. 353) ही गाडीदेखील 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून ते 1 जानेवारी रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या मार्गांवरील बससेवा 2 जानेवारीपासून नेहमीप्रमाणे सुरू राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.