नवी दिल्ली – वैयक्तिक करदात्यांना 2019-20 या आर्थिक वर्षासाठीचे प्राप्तिकर विवरण भरण्यास दहा दिवसांची मुदतवाढ प्राप्ती कर विभागाने जाहीर केली आहे. ( Extension in filing income tax returns )
विवरण भरण्यासाठी दिलेली ही तिसरी मुदतवाढ आहे. त्यामुळे आता वैयक्तिक प्राप्तिकरदात्यांना 10 जानेवारी 2021 पर्यंत विवरण भरता येईल. अगोदर शेवटची तारीख 31 डिसेंबर 2020 होती.
ज्यांच्या खात्याचे ऑडिट होण्याची गरज असते अशा कंपन्या आणि नागरिकांना 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत विवरण सादर करता येणार आहे.
28 डिसेंबर पर्यंत 4 कोटी 54 लाख करदात्यांनी विवरण भरले आहे. ऐनवेळी अनेकांना अडचणी येतात. त्यामुळे ही मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे.