विश्वेश्वर बॅंकेच्या अध्यक्षपदी सुनील रुकारी

उपाध्यक्षपदी सीमंतिनी तोडकर यांची निवड

पुणे – विश्वेश्वर सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाची बैठक होऊन वर्ष 2020 -21 साठी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड करण्यात आली. ॲड. शशिकांत प्रभाकर कुलकर्णी हे निवडणूक निर्णय अधिकारी होते. सुनील नामदेवराव रुकारी यांची अध्यक्षपदावर फेरनिवड करण्यात आली. सीमंतिनी किरण तोडकर यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

या दोन्ही निवडणुका बिनविरोध झाल्या. सुनील रुकारी हे प्रगतिशील शेतकरी असून विविध सामाजिक संस्थांशी संबंधित आहेत. सीमंतिनी तोडकर या गृहिणी व सामाजिक कार्यकर्त्या आहेत.

बॅंकेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम आपटे यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांचे अभिनंदन केले.

निवडीनंतर बोलताना म्हणाले रुकारी म्हणाले की, यावर्षी बॅंकेला एनपीएमुक्त करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. याकामी सर्व कर्मचाऱ्यांनी आणि सभासदांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.