बर्लिन/ ब्रुसेल्स – जर्मनी, हंगेरी आणि स्लोव्हाकिया या देशांमध्ये कालपासून करोना विरोधी लसीकरणाला सुरुवात झाली. या लसीचा पहिला डोस काल नागरिकांना देण्यात आला. युरोपिय संघातील अन्य काही देशांमध्येही करोना विरोधी लसीकरणाला प्रारंभ झाला आहे.
कोव्हिड -19 विरोधी लस युरोपिय संघातील सदस्य असलेल्या सर्व देशांपर्यंत पोचविली गेली आहे. संपूर्ण युरोपियन संघादरम्यान आज लसीकरण सुरू होईल, असे युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डर लेयन म्हणाल्या.
काल फाईझर-बायोएनटेक लसीचा साठा काल युरोपियन संघाच्या सदस्य देशांमध्ये दाखल झाला. बऱ्याच देशांना त्यांच्या पहिल्या टप्प्यामध्ये फक्त 10,000 पेक्षा कमी डोस प्राप्त झाले आहेत. युरोपिय संघातील सर्व देशांमध्ये मिळून किमान 1.6 कोटी जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. तर 3.36 लाख जणांचा मृत्यू झाला आहे.