पुणे – मित्सुबिसी मोटर्स कंपनीने एवायएल मोटर्स यांना पुणे विभासाठी अधिकृत डिलर म्हणून नियुक्त केले आहे. पाजेरो, पाजेरो स्पार्टस्, आऊट लॅंडर, लान्सर, सेडीया, लान्सर इव्हॉल्युशन एक्स, मोटेंरो या गाड्याची देखभाल या सेटरमधून होऊ शकणार आहे.
एवायएल मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक अभय लायगुडे म्हणाले की, आमच्याकडे जागतीक दर्जाची यंत्रसामुग्री आणि कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहकांना खात्रीची कार्यक्षम सेवा आम्ही देऊ शकणार आहोत.
मित्सुबिशी मोटर्सचे पजेरो स्पोर्ट हे मॉडेल ऑफरोडींग करण्याची व कम्फर्टची आवड असलेल्या ग्राहकांचे एक पसंतीचे प्रॉडक्ट आहे. परंतु चांगल्या व अद्ययावत सर्विस सेंटरच्या अभावी ग्राहकांना बऱ्याच वेळा गाडी घेण्याचा मोह आवरता घ्यावा लागत असे.
त्याचबरोबर ज्यांच्याकडे अगोदरपासूनच मित्सुबिशी मोटर्सचे वाहन आहे अशा ग्राहकांनाही बराच वेळा अडचणी येत होत्या. परंतु आता मित्सुबिशी मोटर्सने पुण्यामध्ये एवायल मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड यांना पुणे रिजनसाठी एवायएल मित्सुबिशी नावाने ऍथॉराईज्ड सर्विस आणि जेन्युईन पार्ट डीलरशिप दिली आहे.
पुण्यातील मित्सुबिशीच्या सर्व ग्राहकांच्या सेवेसाठी ही डिलरशिप सर्वांच्या सोयीनुसार म्हणजेच मुंबई – बंगलोर हायवेवर, जेएसपीएम कॉलेज जवळ, ताथवडे, येथे उपलब्ध असून मित्सुबिशी च्या ग्राहकांना अधिक माहिती व सेवेसाठी www.aylmotors.com हि वेब साईटसुद्धा उपलब्ध आहे.