साहित्य : दोडक्याच्या शिरा साधारण एक वाटी झाल्यास पाव वाटी तीळ, पाव वाटी भाजलेले शेंगदाणा कूट अगर पाववाटी किसलेले सुके खोबरे, एक मोठा चमचा तिखट अगर सात-आठ हिरव्या मिरच्या, एक चमचा मीठ
कृती : वरील सर्व जिन्नस, तिखट सोडून, मिरच्या असल्यास मिरच्यांसहित दोन डाव तेलावर खमंग परतावेत. शिरा चुरचुरीत झाल्यावर मीठ, साखर घालून सारखे करून ठेवावे. गार झाल्यावर
खाण्यास न्यावा.