प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण

लोक बिरादरी, आनंदवन, सोमनाथ प्रकल्प पर्यटकांसाठी बंद

नागपूर – समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना गुरूवारी सायंकाळी नागपूर येथील एका खासगी रूग्णालयात हलवण्यात आले आहे. संपर्कातील सर्वांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन प्रकाश आमटे यांनी केले आहे

मागील सात दिवसांपासून आमटे यांना ताप व खोकला होता. बुधवारी त्यांची कोरोना टेस्ट केली असता निगेटीव्ह आली. त्या नंतर औषधे घेऊनही ताप व खोकला कमी होत नव्हता. म्हणून चंद्रपूर येथे तपासणी केली असता कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला. सीटी स्कॅन तसेच ब्लड चेकअपमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान संपर्कातील सर्वांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन प्रकाश आमटे यांनी केले आहे.

कोरोनाने राज्यात परत हातपाय पसरल्याने हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्पासह आनंदवन तसेच सोमनाथ प्रकल्प पर्यटकांसाठी पुढील काही महिने बंद ठेवण्यात येत असल्याचे अनिकेत आमटे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.