नामिबिया – नावात काय आहे असे शेक्सपियर म्हणून गेला असला तरी नामिबियातील निवडणुकीत एडॉल्फ हिटलर नावाच्या व्यक्तीचा विजय झाल्याची घटना घडली आहे.
नामिबियातील बहुतेक नावांवर वसाहतवादाचा प्रभाव आहे. नामिबियावर जर्मनीची दीर्घकाळ सत्ता असल्याने अनेक नावे जर्मन आहेत. नुकत्याच झालेल्या स्तहनिक स्वराज्य निवडणुकीत एडॉल्फ हिटलर उनोना नावाची एक व्यक्ती विजयी झाली. या विजयानंतर केवळ त्याच्या अनोख्या नावामुळे तो एकदम प्रसिद्धी झोतात आला. सत्ताधारी स्वापो पक्षाचा सदस्य असलेल्या हिटलरला ओमपुम्ज या मतदारसंघात तब्बल ८५ टक्के मते पडली.
आपले नाव हिटलर असल्याने लोकांनी आपल्याकडे एवढे लक्ष दिल्याबद्दल हिटलर थोडा नाराज आहे. माझ्या नावाची विनाकारण एवढी चर्चा करण्याची गरज नाही असे त्याचे म्हणणे आहे. आपले नाव असे का ठेवण्यात आले याबाबतही त्याला काही सांगता येत नाही.
१८८४ ते १९१५ या काळात जर्मनीची नामिबियावर सत्ता होती या काळात जर्मन सत्ताधार्यांनी स्थानिक नागरिकांवर अत्याचार केले होते. हिटलरच्या काळात जरी नामिबियावर राज्य नसले तरीही त्याचे नाव ठेवले जात आहे, हि गोष्ट विशेष मानावी लागत आहे.