नवी दिल्ली – भारतीयांचा जगभरात सर्वात जास्त डेटा वापरणाऱ्यांत समावेश होतो. परंतु आमच्या डेटा वापराचा मुख्य लाभ अमेरिकी, युरोपीय, चिनी मीडिया प्लॅटफॉर्मला मोठ्या प्रमाणात होतो. एस्या सेंटरद्वारे तयार करण्यात आलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. वर्ष 2019 मध्ये भारतीय लोक दर महिन्याला सरासरी 12 जीबी डेटाचा वापर करत होते. वर्ष 2020 पर्यंत हा आकडा प्रति महिना 25 जीबीपर्यंत पोहोचला. परंतु हा डेटा बहुतांश परदेशात होस्ट करणाऱ्या सर्व्हरवर खर्च होतो.
भारतीयांद्वारे होणाऱ्या डेटावरील खर्चाचा अतिशय अल्प वाटा भारतीय उत्पादन किंवा सेवेसाठी वापरला जातो. त्याचा मोठा वाटा अमेरिकी, युरोपीय, चिनी मीडिया प्लॅटफॉर्मला मिळतो. एवढ्या मोठ्या इंटरनेट बाजारपेठेचा योग्य वापर करण्यात भारत त्यादृष्टीने अयशस्वी ठरल्याचे दिसते. हा अहवाल तयार करण्याच्या प्रकल्पात निर्माता शेखर कपूर यांचाही सहभाग होता.
भारतासह संपूर्ण दक्षिण आशियात वापरल्या जाणाऱ्या संकेतस्थळांपैकी केवळ 8.8 टक्के संकेतस्थळांचे होस्ट या दक्षिण आशियात आहेत. म्हणजेच उर्वरित सर्व संकेतस्थळ बाहेरील देशात आहे. पूर्व आशियात ही प्रमाण 42 टक्के व अमेरिका-कॅनडात 73.2 टक्के आहे. भारताच्या अंतर्गत मार्केटने परदेशी प्लॅटफॉर्मद्वारे तयार स्थानिक कंटेटला हातोहात घेतले आहे. त्यावरून येथे खूप जास्त क्षमता आहे, हे लक्षात येते.
परदेशी कंपन्या व स्थानिक कंपन्यांत मोठे अंतर आहे. हे अंतर भरून काढण्याची गरज आहे. अहवालात ओटीटीबाबत काही वक्तव्य करण्यात आले आहे. उद्योगाने एकजूट होऊन एक निकष तयार करायला हवा. त्याशिवाय ग्राहकांकडे कंटेटबाबत संपूर्ण माहिती व तंत्रज्ञानाचे नियंत्रण असायला हवे. अशा प्रकारच्या संहिता तयार झाल्यास लहान मुलांचाही वाईट आशयापासून बचाव करता येऊ शकेल. माहितीची गुणवत्ता व माहिती तयार करणाऱ्याला जास्तीचे स्वातंत्र्य मिळावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.