नवी दिल्ली – पूर्व लडाखच्या सीमेवर चीन आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या संघर्षानंतर आता भारतीय नौदलाचे मार्कोस कमांडो फोर्स पॅंगोंग लेकजवळ तैनात करण्यात आले आहे. चीनशी संघर्षानंतर भारतीय वायुसेनेची गरुड व भारतीय सैन्याच्या पॅरा स्पेशल फोर्सेसचे कमांडो आधीच येथे तैनात आहेत. आता नौदलाचे मरीन कमांडोही तैनात करण्यात आले आहेत. या नौदल कमांडोना नवीन बोटी देखील मिळतील ज्यामुळे त्यांना पांगोंग सरोवरात कोणत्याही प्रकारच्या कामकाजासाठी सुलभता येईल.
पॅंगोंग लेकमध्ये मार्कोस कमांडोच्या तैनातीमुळे चीनवरील दबाव वाढेल. मरीन कमांडो तैनात झाल्याने भारतीय वायुसेना, लष्कर आणि नौदलाची ताकद आणखी वाढेल. सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, मरीन कमांडोजच्या तैनात करण्याचे उद्दीष्ट म्हणजे तीन सेवांचे एकीकरण वाढविणे आणि अति थंडीची परिस्थिती उद्भवल्यास नौदल कमांडो त्याला सामोरे जातील. यावर्षी एप्रिल-मेपासून भारतीय आणि चिनी सैन्यात सतत संघर्ष सुरु आहे. मात्र, अद्याप हा तणाव निवळण्याची चिन्हे दिसत नसल्याने भारतीय सुरक्षा दलेही गाफील राहणार नाहीत, असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले आहे.