मुंबई – केंद्र सरकार दर महिन्याला घरगुती गॅस सिलेंडरचे दर जाहीर करत होते. त्यामुळे दर महिन्याला गॅस सिलेंडरची किंमत बदलत असून, त्यामागील अनुदानात देखील बदल होते. जेव्हा तुम्ही घरगुती सिलेंडर बुक करतात आणि जेव्हा त्याची डिलिव्हरी होते. त्यानंतर काही दिवसांनी लगेचच तुमच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा होते. म्हणजेच, आठशे रुपयांच्या सिलिंडरचे साधारण दोनशे रुपयांचे अनुदान तुमच्या आधारकार्डला जोडलेल्या बँक खात्यात जमा होत असते.
अशा परिस्थितीत असे ग्राहक ज्यांच्याकडे अनुदान नसलेले सिलिंडर आहे, ते या अनुदानापासून वंचित राहतात. परंतु अद्याप बऱ्याच लोकांना हे ठाऊक नाही की गॅस सिलिंडरच्या वितरणासह सूट देखील दिली जाते. ही सवलत अनुदानाव्यतिरिक्त विना अनुदानित सिलिंडरवरही उपलब्ध आहे. जेणेकरून विनाअनुदानित ग्राहकांना देखील याचा फायदा होऊ शकतो.
गॅस सिलिंडरचे ऑनलाईन पेमेंट केल्याने त्यांच्या वतीने डिस्काउंट ऑफर देखील देत असतात. केंद्र सरकारच्या डिजिटल पेमेंट मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी या एजन्सी ऑफर देतात. यामध्ये ग्राहकांना कॅशबॅक, इन्स्टंट डिस्काउंट, कूपन, कूपन रीडीम संबंधित इत्यादी काही सुविधा ग्राहकांना दिल्या जातात. विशेष म्हणजे, ही ऑनलाईन सवलत अनुदानित आणि विनाअनुदानित सिलिंडर अशा दोन्ही प्रकारांवर उपलब्ध आहे.
ऑनलाईन पेमेंट करताना तुम्ही अनेक नामवंत कंपन्यांचे अॅप वापरून डिजिटल पेमेंट करू शकता. यामुळे तुम्हाला सवलतीचा मोठा लाभ मिळू शकतो. पेटीएम, फोन पे, यूपीआय, भीम अॅप, गूगल पे, मोबिक्विक, फ्री-चार्ज इत्यादी लोकप्रिय डिजिटल पेमेंट अॅप सर्वत्र उपलब्ध आहे.