बेल्हे – संचारबंदीच्या काळामध्ये आळेफाटा पोलीस ठाण्याअंतर्गत आतापर्यंत 95 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये मार्च महिन्यामध्ये 17 तर एप्रिल महिन्यामध्ये 78 गुन्ह्यांची नोंद झाली असून आतापर्यंत 108 जणांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. तसेच विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करून 70 दुचाकी व 2 चारचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच पुढील काळातही लोकांच्या काळात विनाकारण फिरणाऱ्यांच्या वाहनांवरती अशा प्रकारे कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी सांगितले.
सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन गटांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करणारे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच लॉकडाऊनच्या काळात पिंपळवंडी आणि बोरी या गावांमध्ये धाड टाकून दारूबंदीच्या दोन गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तसेच कल्याण-नगर महामार्गावर पोलिसांचा 24 तास खडा पहारा असून चोख बंदोबस्त ठेवला असल्याचे आळेफाटा पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल के. पी. कुलकर्णी यांनी दिली.