श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील पूछ जिल्ह्यात बुधवारी मिनी बस खोल दरीत कोसळून ९ जण ठार तर २७ जण जखमी झाले. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘बसमध्ये सुमारे 36 प्रवासी प्रवास करत होते. यादरम्यान मैदान ते पूंछकडे जात असताना सावजियांच्या हद्दीतील बरारी नाल्याजवळ बसला अपघात झाला.’
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘लष्कर, पोलिस आणि स्थानिक ग्रामस्थांकडून या भागात संयुक्त बचाव मोहीम राबवली जात आहे. जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आणि मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली.’
Jammu & Kashmir | A mini-bus accident occurred in the Sawjian area of Poonch. Army’s rescue operation is underway; 9 deaths reported, many injured shifted to a hospital in Mandi. Further details awaited: Mandi Tehsildar Shehzad Latif pic.twitter.com/NMFhtuK5lj
— ANI (@ANI) September 14, 2022