वाघोली (प्रतिनिधी) – पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचे मार्गदर्शनाखाली पुणे शहर पोलीसांतर्फे व्यसनमुक्ती व महिला सुरक्षा या विषयांवर विविध प्रकारे विविध पातळीवर वेगवेगळे उपक्रम राबवले जात असून.
त्याचाच एक भाग म्हणून लोणीकंद पोलीस ठा वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन लोणीकंद पोलीस ठाणे, हद्दीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांचे संकल्पनेतुन व्यसनमुक्ती व महिला सुरक्षा याकरिता ७६ किमी रिले दौड चे आयोजन करण्यात आले होते.
त्यामध्ये लोणीकंद पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते. बकोरी फाटा येथुन सकाळी ०६/३० वा. रिले दौड ला सुरुवात करण्यात आली. तेथुन पुढे जेएसपीएम कॉलेज रोड, आयव्ही इस्टेट रोड, केसनंद फाटा, डोमखेल रोड, बायफ रोड,
वाघोली गाव, आव्हाळवाडी, मांजरी खुर्द, कोलवडी, केसनंद, वाडेगाव, वाडेबोल्हाई, आष्टापुर, पिंपरी सांडस, बुर्केगाव, डोंगरगाव, पेरणे गाव, वदु खुर्द, तुळापुर, फुलगाव, आळंदी फाटा अशी दौड करत लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे येथे शेवट करण्यात आला..
सदरचे दौड दरम्यान गावोगावी पोलीसांचे चे स्वागत करण्यासाठी शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. प्रत्येक ठिकाणी व्यसनमुक्ती व महिला सुरक्षा चे अनुषंगाने नागरिकांशी संवाद साधत व देश भक्तीपर घोषणा देण्यात आल्या. तसेच ग्रामस्थ व प्रतिष्ठीत नागरिक यांनी सदर उपक्रमाचे स्वागत करुन कौतुक केले.
सदरची व्यसनमुक्ती व महिला सुरक्षा संदर्भातील दौड़ पोलीस आयुक्त, रितेश कुमार , पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक, अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उप-आयुक्त शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील, यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहाने आयोजित करण्यात आली