पिंपरी – मातृवंदना योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना देण्यात येणाऱ्या सहा हजार रुपयांचा लाभ शहरातील 57468 महिलांनी लाभ घेतला असून महापालिकेने हे उद्दिष्ट्ये 105 टक्के पूर्ण केले आहे. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मदत म्हणून सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो.
केंद्र शासनाकडून महिलांसाठी पीएम मातृत्व वंदना ही विशेष योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मदत म्हणून सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो. याच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या पैशातून त्या संबंधित गर्भवती महिलेला आपले व आपल्या बाळाच्या आरोग्याची आणि आहाराची व्यवस्था करण्यास मदत होते. पिंपरी चिंचवड शहरात 2017 पासून ही योजना शहरात राबविण्यात येत आहे असून आत्तापर्यंत शहर परिसरातील 57 हजार 468 महिलांनी घेतला आहे.
आरोग्य अन् आहार व्यवस्थापन
या योजनेचा फायदा गर्भवती महिला आणि नवजात बालकांना होतो. यामुळे गर्भवती महिलांना आपल्या आहाराचे व्यवस्थापन, आरोग्याची काळजी घेण्यास मदत होते. शिवाय गर्भवती महिलांना प्रसुती नंतर एक हजार रुपये मिळतात. यामुळे संबंधित लाभार्थी गर्भवती महिलांच्या बालकाला देखील यामुळे फायदा होतो. कुपोषण दूर करण्यासाठी सुरू करण्यात आलेली ही योजना निश्चितच महिलांसाठी कल्याणकारी योजना आहे.
ही योजना 2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली केंद्राची एक महत्वाची योजना आहे. त्या वेळी पुढील पाच वर्षांत अर्थात 2017 ते 2023 या पाच वर्षांत पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील 54 हजार 587 महिलांना या येजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट्य निश्चित केले आहे. मार्च 2023 पर्यंत 57 हजार 468 महिलांनी या योजनेचे लाभ घेतला आहे. त्यामुळे 105.3 टक्के उद्दिष्ट्य गाठले आहे.
– वर्षा डांगे-वालावलकर, महिला वैद्यकीय अधिकारी, महापालिका.
योजनेच स्वरूप
या योजनेच्या माध्यमातून शहरातील गर्भवती महिलांना 6000 रुपये दिले जातात. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना एकूण चार टप्प्यात निधीचे वाटप केले जाते. यामध्ये पहिल्या टप्प्यात एक हजार रुपये दिले जातात. यानंतर दुसऱ्या टप्प्यात 2000 आणि तिसऱ्या टप्प्यात 2000 दिले जातात. योजनेअंतर्गत चौथ्या टप्प्यात दिले जाणारे हजार रुपये बाळाच्या जन्मानंतर दिले जातात.