सातारा – सातारा नगरपालिका आणि मेढा नगरपंचायत हद्दीतील विविध विकासकामांसाठी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
मेढा हद्दीत सातारा-महाबळेश्वर रोडलगत रस्ता दुभाजकाला विद्युत पोल, दिवे बसवणे 40 लाख, प्रभाग 12 मध्ये अनंता कुंभार घर ते संत गोरा कुंभार मंदिरापर्यंत आणि प्रभाग 11 मधील शामराव वाघमारे घर ते महादेव मंदिर विहिरीपर्यंत बंदिस्त गटार 15 लाख, प्रभाग 12 मध्ये संत गोरा कुंभार मंदिरापासून मेढा-मोहाट पुलाकडील रस्त्यावर साकव व डांबरीकरण 10 लाख, प्रभाग 2 मध्ये बौद्धविहारात सामाजिक सभागृह 10 लाख, प्रभाग 4 मध्ये गोरे वस्तीलगत पाण्याची टाकी, बोअरवेल, वितरण व्यवस्था आणि प्रभाग 16 मधील वृंदावन कॉलनीत बंदिस्त गटार 17 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
साताऱ्यात गुरुवार बागेजवळ सांस्कृतिक भवन 25 लाख, प्रभाग 19 मध्ये सिमेंट कॉंक्रीट रस्ते व पायऱ्या 35 लाख, शाहूपुरीत हॉटेल सन डॉन ते आंबेदरे रस्ता डांबरीकरण व गटार, म्हसवे रोड, दत्त कॉलनी रस्ता डांबरीकरण 20 लाख, म्हसवे रोड, भैरवनाथ कॉलनी ते अम्बर प्लाझा रस्ता व गटार 12 लाख, शाहूपुरीत यशवंतनगरात अंतर्गत रस्ते व गटार 22 लाख, फॉरेस्ट कॉलनीत गार्डन, मुलांसाठी खेळणी व वॉकिंग ट्रॅक 25 लाख, माची पेठेत संरक्षक भिंत 35 लाख, मंगळवार पेठेत बालाजी अपार्टमेंट पिछाडीस शिंदे घर-काळे घर, झोपडपट्टी परिसरात पायऱ्या आणि कॉंक्रीट रस्ता 13 लाख,
सर्वोदय कॉलनीत बॅडमिंटन हॉल 50 लाख, तामजाईनगरात विघ्नहर्ता कॉलनी रस्ता खडीकरण 10 लाख, झेंडा चौक, भैरवनाथ पटांगण ते स्वागत कमान आणि गणेश भोसले ते कुंभार गिरणी, हायवेपर्यंत रस्ता डांबरीकरण 17 लाख, महालक्ष्मी कॉलनी सपकाळ घर ते समर्थनगर कॉलनी रस्ता 15 लाख, शाहूपुरी आझादनगरात सांस्कृतिक भवन 7 लाख, शनिवार पेठेत आप्पा गवळी घर ते खाटीक मशीद अखेर कॉंक्रीट 10 लाख रुपये, गुरुवार परज मशीद परिसरात कॉंक्रीटीकरण 10 लाख, शाहूनगर आनंद कॉलनी ते बारटक्के घर रस्ता डांबरीकरण 15 लाख, प्रतापगंज पेठेत भंडारे घर ते चिटणीस घर, लकेरी घर ते ऐक्य प्रेस पाइपड्रेन 15 लाख, सदरबझारमध्ये संदीप पवार घर ते गणपती मंदिर अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करणे 20 लाख, गोळीबार मैदान, साई सोसायटी, दत्त मंदिरासमोर सभामंडप बांधणेसाठी 15 लाख आणि पिरवाडी येथे बंदिस्त गटर व पाईप ड्रेन करण्यासाठी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.