लष्करी उठाव होऊ नये म्हणून पाकिस्तानात विधेयक संमत
नवी दिल्ली, ता. 14 – पाकिस्तानात लष्करी उठावाला प्रतिबंध करणारे विधेयक आज पाकिस्तान नॅशनल असेंब्लीने संमत केले. राज्यघटनेचा भंग करून मोठा देशद्रोह करणाऱ्या व्यक्तीला फाशीच्या शिक्षेची किंवा जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद विधेयकात करण्यात आली आहे. ही बातमी पाकिस्तान रेडिओवरून प्रसारित झाली आहे.
भलतेच बटण वैमानिकाने दाबल्याने जेट विमान पळविल्याची बातमी
रोम – ज्या इथिओपियन एअरलाइनमध्ये हेल सेलासी हे एक प्रवासी विमान होते ते विमान पळवल्याचा संदेश गेला. हे बोईंग 707 जेट विमान पश्चिम जर्मनीतील कोलोनमधून इथिओपिआच्या राजधानीकडे चालले होते. वैमानिकाने चुकून भलतेच बटण दाबून विमान पळव्याने विमान ताब्यात घेतल्याचा संदेश इटलीवरून उड्डाण करताना दिला. त्या विमानात 30 प्रवासी होते.
10 वर्षांचे यादवी युद्ध संपले
व्हिएनतिएन – लाओस सरकार व कम्युनिस्ट दल यांत आज येथे शांतता करार झाल्याची बातमी आहे. या कराराने 10 वर्षांचे यादवी युद्ध संपुष्टात आले.
फ्रान्सने अण्वस्त्र चाचण्या बंद
पॅरिस – दक्षिण पॅसिफिक महासागरात यापुढे अण्वस्त्रांच्या चाचण्या करण्यात येणार नाहीत, असे फ्रान्स सरकारने येथे जाहीर केले आहे.
सरकारी दूधकपात रद्द झाली नाही
पुणे – सरकारी दूध योजना अधीक्षकांनी दूध कपात रद्द झाल्याचे जाहीर केले. त्या घोषणेचा आवाज हवेत विरतो न विरतो तोच सरकारी दूध केंद्रावर कोट्याप्रमाणे दूध मिळणार नाही, आहे तेवढे घेऊन जा, असे सांगण्यास प्रारंभ झाला आहे.
केंद्र सरकारी नोकऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ
नवी दिल्ली – दरमहा 560 रुपयांपर्यंत पगार घेणाऱ्या केंद्रीय सरकारच्या नोकरांच्या महागाईभत्त्यात 7 ते 10 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.