प्रे. भुट्टो बांगला देशास अगोदर मान्यता देण्यास तयार आहेत पण-
नवी दिल्ली, ता. 25 – पाकिस्तान बांगला देशास लवकरच मान्यता देणार आहे, असे वृत्त येथे प्रसिद्ध झाले होते पण पाक नेते पुन्हा मूळ पदावर आले असून पाक युद्धकैदांची सुटका व बांगला देशास मान्यता हाच हेका त्यांनी धरला आहे.
पाक राष्ट्रीय असेंब्लीत एक ठराव येणार असून त्याअन्वये प्रे. भुट्टो यांना बांगला देशाला मान्यता देणाचा अधिकार देण्यात येणार आहे. मात्र, त्यापूर्वी पाक युद्धकैदांची सुटका करण्यात आली पाहिजे.
यापूर्वी अशी बातमी होती की, प्रे. भुट्टो हे राष्ट्रीय असेंब्लीला असे सांगणार होते की,
195 पाक युद्धगुन्हेगारांवरील खटले भरावयास नको असेल तर बांगला देशाला मान्यता देणे भाग आहे. त्यायोगे 90 हजार पाक युद्धकैदी मुक्त होतील. पाककडून उत्तर आले
भारताकडून उत्तराचा “काळजीपूर्वक विचार’
नवी दिल्ली – भारत व पाक या दोन देशांमध्ये अधिकारी पातळीवर बोलणी व्हावीत म्हणून परराष्ट्रमंत्री स्वर्णसिंग यांनी पाठविलेल्या पत्रास पाककडून उत्तर पाठविण्यात आले. हे पत्र काल येथे पोहोचले असे परराष्ट्र खात्यातर्फे सांगण्यात आले. हा पत्रव्यवहार स्वीस सरकारच्या वकिलातीमार्फत करण्यात आला.
परराष्ट्राचा दौरा उरकून स्वर्णसिंग येथे आल्यावर काही तासांनीच हा पत्रव्यवहार करण्यात आला. हे पत्र पाकच्या परराष्ट्र व संरक्षणमंत्री अझीझ अहमद यांनी पाठविले आहे.
बांगला देश सरकारशी सल्लामसलत केल्यावर या पत्राचा काळजीपूर्वक विचार करण्यात येईल. पाक अध्यक्ष भुट्टो यांनी पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे मरी येथे बोलणी होण्यासंबंधी या पत्रात काही आहे का? या प्रश्नास प्रवक्त्याने उत्तर देण्याचे टाळले.