मागासवर्गीयांना शिक्षणापासून वंचित करू नये – शरद पवार
कोल्हापूर, दि. 25 – समाजातील मागास व गरीब माणसापर्यंत शिक्षण पोचले पाहिजे हा विचार महाराष्ट्रात सर्वत्र रुजला आहे. यासाठी महाराष्ट्र शासन शिक्षणावर फार मोठा खर्च करीत आहे. समाजातील दुर्बल, दलित, आदिवासी आणि गरीब अशा लोकांना जास्तीतजास्त शिक्षणाचा लाभ होणे आवश्यक आहे. ह्या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे उद्गार महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री शरद पवार यांनीबोलताना काढले.
लोकांचा हातभार जरूर
छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, महर्षी शिंदे आदी समाजसुधारकांनी सुरू केलेल्या सामाजिक क्रांतीचे विचार समाजात रुजवण्यासाठी शिक्षण हे सामान्य माणसापर्यंत पोचले पाहिजे.
मुष्टियुद्धातील अजिंक्यपद महंमद अलीने कायम राखले
क्लेव्हलॅंड – पंधराव्या राउंडला चक येपनरला ठोशाने खाली पाडून महंमद अलीने हेवीवेट मुष्टीयुद्धातले जागतिक अजिंक्यपद आपल्याकडे कायम राखले.
इस्रायली सेनेस सज्जतेचा आदेश
तेल अवीव्ह – आपल्या अयशस्वी शांतिदौऱ्यानंतर डॉ. किसिंजर पश्चिम आशियातून रवाना होऊन पुरा एक दिवससुद्धा संपण्याआधीच इस्रायलच्या सरहद्दीवर तणाव वाढत असल्याने इस्रायली सैन्याला आज सज्जतेचा आदेश देण्यात आला आहे.