औरंगाबाद – औरंगाबादमध्ये बुधवारी दिवसभरात आणखी 47 नवीन करोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील एकूण करोनाबाधित रुग्णांचा आकडा 1 हजार 696 वर पोहोचला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, यातील 1 हजार 85 रुग्ण बरे झाले असून आतापर्यत 85 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 526 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे.
औरंगाबादमध्ये एकूण 18 कंटेंटमेन्ट झोन असून येथील परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, अमरावतीत आज 7 नवीन करोनाबाधीत रुग्ण आढळून आले. यामुळे एकूण रुग्णांची संख्या 256 वर पोहोचली असून आतापर्यत 16 जणांचा मृत्यू झाला आहे.