मोरारजी देसाईंच्या निवडीस हरकत
नवी दिल्ली, दि. 20 – पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या लोकसभेवरील निवडीस आव्हान देणारा अर्ज आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. एन. भगवती यांनी फेटाळून लावला. जसवंत चौहाण यांनी हा अर्ज केला होता.
ठरलेली मुदत उलटून गेल्यावर तो दाखल झाला, या कारणास्तव तो फेटाळला गेला. देसाई हे पंतप्रधानपदी रुजू झाल्यानंतर 45 दिवसांच्या आत हा अर्ज दाखल व्हायला हवा होता. परंतु तो 10 मे रोजी, म्हणजे 1 दिवस उशिरा झाला.
पाक नभोवाणी नियंत्रणातून मुक्त
इस्लामाबाद – पाकिस्तानच्या लष्करी राजवटीने नभोवाणी आणि दूरचित्रवाणी सरकारी हस्तक्षेपातून व नियंत्रणातून मुक्त केल्याचे जाहीर करण्यात आले.
हैदराबाद हाउसमध्ये राष्ट्रपती राहणार?
नवी दिल्ली- राजधानीतील हैदराबाद हाउसमध्ये राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी हे राहायला जाण्याची शक्यता आहे. या संबंधीचा अंतिम निर्णय रेड्डी यांच्याकडेच सोपविला आहे. हैदराबाद हाउस हे इंडिया गेटनजिक आहे. निजामाने ते बांधले आहे.