सीरिया-इराक हद्द बंद
दमास्कस, दि. 16 – येथे नव्याने झालेल्या बॉम्बहल्ल्यांमुळे अध्यक्ष हफीज आसद यांनी सीरिया-इराक सरहद्द बंद करण्याचा आदेश
दिला आहे.
नद्यांचे राष्ट्रव्यापी जाळे
नवी दिल्ली – नद्या एकमेकांना जोडून त्यांचे राष्ट्रव्यापी जाळे तयार करण्याविषयी कॅप्टन दिनशा जे. दस्तूर यांनी एक योजना तयार केली असून ती सरकारच्या विचाराधीन आहे, असे राज्यसभेत भानूप्रताप सिंग यांनी सांगितले. या योजनेला 15000 कोटी रुपये खर्च येईल.
मिसा रद्द होणार?
नवी दिल्ली – अंतर्गत सुरक्षा कायदा (मिसा) रद्द करण्याच्या प्रश्नावर सरकार क्रियाशीलपणे विचार करीत आहे, असे गृहमंत्री चरणसिंग यांनी लोकसभेत एका लेखी उत्तराद्वारे सांगितले. चित्र बसू व सी. आर. महाता यांनी याविषयी प्रश्न विचारला होता.
भारत पाणबुड्या बनविणार
नवी दिल्ली – भारतात परकीय सहभागाने पाणबुड्या बनविण्यासंबंधी अनेक देशांशी बोलणी सुरू केली आहे, असे आज लोकसभेत संरक्षणमंत्री जगजीवनराम यांनी एका लेखी उत्तराद्वारे जाहीर केले.