महापालिकांना कर्जावरील व्याज शासनाकडून मिळेल
पुणे, दि. 10 – महापालिकांनी शहरांच्या विकासासाठी व्यापारी बॅंकांकडून कर्ज घेतल्यास त्यावरील व्याज सबसिडी म्हणून शासनाकडून देण्याची एक योजना विचाराधीन असल्याची माहिती नगरविकास खात्याचे राज्यमंत्री सुशीला बलराज यांनी दिली. पुण्यातील झोपडपट्टी विकासासाठी मुंबईप्रमाणेच पैसा अजिबात अपुरा पडू देऊ नका,
अशी सूचना त्यांनी केली. महापालिकेला जादा ग्रॅंडसाठी आमदारांनी शासनाकडे आग्रह धरला पाहिजे. यावेळी पिंपरी-चिंचवड नगरपालिका महापालिकेत समाविष्ट करावी यावर त्या म्हणाल्या, यावर नेमलेल्या एकसदस्य समितीने अद्याप अहवाल दिला नसल्याने शासनाने निर्णय घेतलेला नाही.
अन्याय सहन करणार नाही व्यापारी वर्गाचा इशारा
पुणे – अपकृत्यातून होणारे नुकसान आजपर्यंत व्यापारीवर्ग संयमाने सोशित आला. आता असा होणारा अन्याय सहन करण्याच्या मनस्थितीत व्यापारीवर्ग नाही, अशा इशारा व्यावसायिक संघटनेने दिला आहे.
याविषयी काढलेल्या पत्रकात आंदोलने-प्रतिआंदोलनाचे वेळी नागरिकांच्या मालमत्तेचे व जीविताचे रक्षण झाले पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. अधिकाऱ्यांनी योग्य ती दक्षता घेऊन दुर्घटना टाळल्या पाहिजेत, असेही पत्रकात म्हटले आहे.
शांततेचे नोबल पारितोषिक
ऑस्लो – 1977 सालचे शांततेचे नोबल पारितोषिक अनेमस्टी इंटरनॅशनल या संस्थेस मिळाले आहे.