वाई -किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी 195 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे 21 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी 46 उमेदवार रिंगणात राहिल्याचे स्पष्ट झाले. विद्यमान अध्यक्ष मदन भोसले यांच्या पॅनेलविरोधात विरुद्ध आमदार मकरंद पाटील यांचे पॅनेल यांच्यात प्रमुख लढत होत आहे.
या दोन्ही पॅनेलकडून प्रत्येकी 21 उमेदवार रिंगणात आहेत. शिवाय इतर अन्य चार असे 46 उमेदवार रिंगणात आहेत. मदन भोसले यांच्या शेतकरी विकास पॅनेलचे गटनिहाय उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत. कवठे खंडाळा- दत्तात्रय गणपतराव गाढवे, प्रवीण विनायक जगताप, प्रताप ज्ञानेश्वर यादव. भुईंज- मदनराव प्रतापराव भोसले, जयवंत सूर्यकांत पवार, दिलीप भीमराव शिंदे. वाई, बावधन जावळी- चंद्रसेन सुरेशराव शिंदे, सचिन आप्पासाहेब भोसले, विश्वास रामराव पाडळे.
सातारा- भुजंगराव जिजाबा जाधव, चंद्रकांत बजरंग इंगवले, अनिल पांडुरंग वाघमळे. कोरेगाव- मेघराज सुरेश भोईटे, नवनाथ निवृत्त केंजळे, शिवाजी रामदास पवार. महिला- विजया जयवंत साबळे, आशा दत्तात्रय फाळके. अनुसूचित जाती जमाती- सुभाष तात्याबा खुडे. विमुक्त भटके जमाती- चंद्रकांत वामन काळे. इतर मागास वर्ग- आनंदा कोंडीबा जमदाड. सोसायटी- रतनसिंह सर्जेराव शिंदे. आ. मकरंद पाटील यांचे शेतकरी परिवर्तन पॅनेलचे गटनिहाय उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत.
कवठे खंडाळा- नितीन लक्ष्मणराव जाधव पाटील, रामदास संपतराव गाढवे, किरण राजाराम काळोखे. भुईंज- प्रमोद भानुदास शिंदे, रामदास महादेव इथापे, प्रकाश लक्ष्मण धुरगुड. वाई, बावधन, जावळी- शशिकांत मदनराव पिसाळ, दिलीप आनंदराव पिसाळ, हिंदुराव आनंदराव तरडे. सातारा- संदीप प्रल्हाद चव्हाण, बाबासाहेब शिवाजी कदम, सचिन हंबीरराव जाधव. कोरेगाव- सचिन घनश्याम साळुंखे, ललित जोतिराम मुळीक, संजय अरविंद फाळके. सोसायटी- मकरंद लक्ष्मणराव जाधव पाटील.
महिला राखीव- सुशीला भगवानराव जाधव, सरला श्रीकांत वीर. अनुसूचित जाती जमाती- संजय निवृत्ती कांबळे. भटके विमुक्त जाती- हणमंत बाबासाहेब चवरे. इतर मागास प्रवर्ग- शिवाजीराव बंडू जमदाडे. याशिवाय नवनाथ रघुनाथ साबळे सातारामधून, मानसिंग नारायण शिंगटे भुईंज गटातून तर दिलीप उद्धव जाधव व रमेश दगडू माने कोरेगावमधून व्यक्तिगत अर्ज राहिले आहेत.
कॉंग्रेसला दोन जागा
या निवडणुकीसाठी 347 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. सर्वाधिक अर्ज राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून दाखल होते. गत पंचवार्षिकपेक्षा यावेळी इच्छुक उमेदवारांची संख्या लक्षणीय होती. या आखाड्यात दोघा पाटील बंधूंनी दंड थोपटल्याने भोसले विरुद्ध पाटील असा पारंपरिक राजकीय संघर्ष पुन्हा एकदा पाहयला मिळणार हे स्पष्ट झाले होते. कॉंग्रेस व शिवसेनेकडूनही अनेक जण इच्छुक असल्याने महाविकास आघाडीचा फ़ॉर्म्युला इथे वापरला जाणार का, याबाबत चर्चा सुरु होती. आजचे चित्र पाहता कॉंग्रेसला अवघ्या दोन जागा देण्यात आल्या आहेत. भोसले यांनी पुन्हा बहुतेक सर्व विद्यमान संचालकांना मैदानात उतरवले आहे. यामध्ये रतन शिंदे, प्रताप यादव, प्रवीण जगताप यांचा समावेश आहे. तर पाटील गटानेही तगडे उमदेवार दिले आहेत. यामध्ये माजी मंत्री मदनराव पिसाळ यांचे चिरंजीव शशिकांत पिसाळ, माजी सभापती दिलीप पिसाळ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे यांचा समावेश आहे.