मुंबई – मुंबई सीमाशुल्क विभागाच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने आज तळोजा येथे हेरॉईन, कोकेन, गांजा, चरस यासारखे अंमली आणि मनावर परिणाम करणारे नशा आणणारे 54.850 किलो पदार्थ नष्ट केले. मुंबई सीमाशुल्क विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर अंमली पदार्थ नष्ट करण्याची मोहीम राबवण्यात आली.
महाराष्ट्रात नवी मुंबईतील तळोजा येथील घातक कचरा प्रक्रिया साठवण आणि विल्हेवाट सुविधा येथे हे अंमली पदार्थ जाळून नष्ट करण्यात आले. नष्ट करण्यात आलेल्या अंमली पदार्थाची अवैध बाजारपेठेतील किंमत सुमारे 410 कोटी रुपये आहे.
या वर्षभरात अंमली पदार्थ नष्ट करण्याची ही तिसरी वेळ आहे. पहिल्यांदा 02.03.2023 रोजी अंदाजे 240 कोटी रुपये किंमतीचे 61.585 किलो आणि 19.07.2023 रोजी दुसऱ्यांदा अवैध बाजारात 865 कोटी रुपये किंमतेचे 128.47 किलो अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले. अशा प्रकारे, या वर्षात 1515 कोटी रुपये किंमतीचे एकूण 244.905 किलो अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले.