भिवंडीत अवैधरित्या राहणारे 40 बांगलादेशी अटकेत

भिवंडी – भिवंडी येथे अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या 40 बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे. भिवंडी पोलिसांनी ही दुसरी मोठी कारवाई केली आहे. अटक केलेले सर्व बांगलादेशी वळगाव येथील प्रितेश कंपाऊंड आणि कामतघर येथील चाचा भतीजा कंपाऊंडमध्ये मजुरी करत होते. अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशींकडून पासपोर्ट, आधार कार्ड, पॅनकार्ड, 28 मोबाइल पोलिसांनी जप्त केले आहेत.

तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून तब्बल चाळीस बांगलादेशींना भिवंडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड, 28 मोबाइल पोलिसांनी जप्त केले असून अजून कोणी राहत आहे का याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.

हे सर्व जण पासपोर्ट नसताना पैसे कमावण्याच्या उद्देशाने छुप्या मार्गाने दलालाच्या मदतीने बांगलादेशातून भिवंडीत येऊन अनधिकृतपणे वास्तव्यास राहून मजुरी करीत असल्याचे आढळून आले आहे. मागील दहा दिवसांपूर्वी भिवंडीतील कोनगाव पोलिसांनी देखील अशाच प्रकारे अवैध वास्तव्य करणाऱ्या नऊ बांगलादेशी नागरिकांविरोधात कारवाई करून अटक केली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.