पेशावर – पाकिस्तानातील खैबर पख्तुन्वा प्रांतात नव्याने उभारण्यात आलेल्या पोलीस स्थानकावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 4 पोलीस कर्मचारी ठार झाले आहेत. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याचेही समजते आहे. दक्षिण वझिरीस्थान या आदिवासी जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या लाकी मारवाल येथील बारगाई पोलीस स्थानकावर हा दहशतवादी हल्ला झाला आहे.
दहशतवाद्यांनी हातबॉम्ब आणि ग्रेनेड लॉंचरच्या सहाय्याने हा हल्ला केला होता. पोलिसांबरोबर झालेल्या धुमस्चक्रीनंतर हल्लेखोर दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर संशयित दहशतचवाद्यांच्या शोधासाठी पोलिसांची मोठी कुमक पाठवून देण्यात आली आहे.
कैबर पख्तुन्वा प्रांताचे मुक्यमंत्री मेहमूद खान, पंतप्रदान शेहबाझ शरीफ आणि पाकिस्तानचे अध्यक्ष आरिफ अल्वी यांनी या हल्ल्यानत ठार झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांबद्दल सहवेदना व्यक्त केल्या आहेत. आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारलेली नाही. मा6 हा हल्ला तेहरिक ए तालिबान पाकिस्तानने केला असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. गेल्याच महिन्यात या संघटनेने सरकारबरोबरची युद्धबंदी संपल्याचे जाहीर केले आहे.