सातारा – जिल्ह्यात गुरुवारी (दि. 8) रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार 345 नागरिकांना करोनाचा संसर्ग झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. गेल्या आठवडाभरात बाधितांचे प्रमाण घटल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे; परंतु दुसरीकडे करोनाबाधितांचा मृत्युदर नियंत्रणात आणण्याचे आव्हान जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागासमोर आहे.
सातारा तालुक्यामध्ये सातारा शहरात मंगळवार पेठ दहा, सदरबझार सहा, शनिवार पेठ, रविवार पेठ, प्रतापगंज पेठ, शाहूनगर प्रत्येकी दोन, रामाचा गोट, सोमवार पेठ, यादोगोपाळ पेठ, चिमणपुरा पेठ, पंताचा गोट, विसावा नाका प्रत्येकी एक, इतरत्र 15, शिवथर आठ, करंजे, पाटखळ प्रत्येकी सहा, खेड, दौलतनगर प्रत्येकी पाच, देगाव, निनाम, तामजाईनगर प्रत्येकी चार, अतीत, कोडोली, सालवण, वर्ये प्रत्येकी तीन, नागठाणे दोन, शाहूपुरी, संगमनगर, संभाजीनगर, देशमुखनगर, सोलवाडी सोनवणे, कोंडवे, लिंब, कारंडवाडी, यशवंतनगर, पाडळी, बोरगाव, कामेरी, धावडशी, शिवदे, गडकर आळी, तडवळे, अपशिंगे, सैदापूर प्रत्येकी एक, कराड तालुक्यामध्ये कराड शहरात शुक्रवार पेठ, विद्यानगर प्रत्येकी एक, इतरत्र आठ, गोळेश्वर नऊ, मसूर सहा, टेंभू, वडगाव हवेली, नारायणवाडी प्रत्येकी तीन, तांबवे, आगाशिवनगर, शेरे प्रत्येकी दोन, कोळे, वाठार, येरवळे, मलकापूर, रिसवड, निगडी, इंदोली, कावेडी, मानव, जखीणवाडी
भवानवाडी, आटके, धोंडेवाडी, उंब्रज, खुबी, काले, कार्वे, वेळे, सुर्ली प्रत्येकी एक, फलटण तालुक्यामध्ये फलटण शहरात बुधवार पेठ, रविवार पेठ, इतरत्र प्रत्येकी एक, धुळदेव, कोळकी प्रत्येकी चार, उपळवे, जाधववाडी प्रत्येकी दोन, काळज, मुंजवडी, बरड, निरगुडी, पवारवाडी, चौधरीवाडी, साखरवाडी, पाडेगाव प्रत्येकी एक. वाई तालुक्यामध्ये वाई शहरात गंगापुरी दोन, रविवार पेठ, ब्राह्मणशाही, सोनगीरवाडी, हनुमाननगर, गणपती आळी, फुलेनगर प्रत्येकी एक, इतरत्र पाच, कवठे तीन, अभेपुरी, धोम, वेलंग, चिखली, गुळुंब, वयगाव, राऊतवाडी, मालतपूर, कणूर, शिरगाव प्रत्येकी एक, पाटण तालुक्यात पाचुपतेवाडी, मालदन, माजगाव, कोंजवडे, ढेबेवाडी प्रत्येकी एक, खंडाळा तालुक्यात लोहगाव, कण्हेरी, खेड बुद्रुक, बिरोबा वस्ती प्रत्येकी एक, महाबळेश्वर तालुक्यात पाचगणी, देवळी प्रत्येकी एक, खटाव तालुक्यात वडूज, औंध, पुसेगाव प्रत्येकी चार, काटकरवाडी, कातरखटाव प्रत्येकी तीन
डिस्कळ, करंजखोप प्रत्येकी दोन, खटाव, खातवळ, काटेवाडी, मायणी, कुरोली, बुध प्रत्येकी एक, माण तालुक्यात दहिवडी आठ, मार्डी, म्हसवड प्रत्येकी तीन, शंभूखेड, जांभुळणी प्रत्येकी दोन, बोराटवाडी, दोरगेवाडी, वरुड, बिदाल प्रत्येकी एक, कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 12, किन्हई, कुमठे प्रत्येकी चार, पिंपरी दोन, दुघी, नागझरी, रहिमतपूर, पाडळी, सासुर्वे, एकंबे, वेळू, जळगाव, अंभेरी, निढळ, ल्हासुर्णे, बर्गेवाडी प्रत्येकी एक, जावळी तालुक्यात कुडाळ दोन, भोगवली, सोमर्डी, कुसुंबी प्रत्येकी एक, इतर दहा, असे 345 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.