नवी दिल्ली: देशात सध्या सुरू असलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एक वर्ष आपल्या पगाराच्या 30% दान देण्याचे ठरविले आहे. ही माहिती राष्ट्रपती भवनातून देण्यात आली आहे. यापूर्वी राष्ट्राध्यक्ष कोविंद यांनी मार्च महिन्याचा संपूर्ण पगार पंतप्रधान केयर्स फंडात दान केला होता. राष्ट्रपती भवनाच्या वतीने सांगण्यात आले की पारंपारिक समारंभात वापरण्यात येणाऱ्या लिमोझिन (कार) खरेदीचा प्रस्तावही पुढे ढकलण्यात आला आहे.
Consumption during ceremonial occasions like At-Home ceremonies&state banquets will be minimised by taking measures like keeping smaller guest lists to maintain social distance,lesser usage of flowers&items for decoration&reducing food menu to extent possible: Rashtrapati Bhavan https://t.co/HgnQ0eG8Za
— ANI (@ANI) May 14, 2020
गुरुवारी भारतात कोविड -19 संक्रमित झालेल्यांची एकूण संख्या, 78,003 वर पोहचली. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 2549 लोकांचा मृत्यू झाला आहे तर संसर्ग झालेल्यांची संख्या 78,003 वर पोचली आहे.