मुंबई – स्टार किड्सचा सध्या बॉलिवूडमध्ये बोलबाला आहे. कुणी आपल्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला विदेशात घेऊन जाताना दिसतंय तर कोणी आपल्या मुलाला बॉलिवूडमध्ये लॉंच करण्याची तयारी करत आहे. अशात कॉमेडी स्टार कपिल शर्मा आपल्या मुलीसोबत चक्क रॅम्प वॉक करताना दिसून आला. त्यावेळेसचा त्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.
कपिल शर्माने त्याची मुलगी अनायरा शर्मासोबत पहिल्यांदा रॅप वॉक केला. एका फॅशन शोसाठी कपिलने मुलीसोबत हजेरी अल्वाली. वडिलांचा हात धरून रॅपवर चालणारी अनायरा खूप आत्मविश्वासाने चालत असल्याचे यावेळी दिसून आले. न डगमगता न घाबरता यावेळी चिमुकलीने रॅम्पवरून चालत जाऊन सर्वांची मने जिंकली.
नेटकऱ्यानी यावेळी कपिलच्या मुलीचं चांगलच कौतुक केलं आहे. छोट्या अनायराची ही गोड अदाकारी अनेकांना आवडली आहे. यावेळी अनायराने वडिलांप्रमाणे ब्लॅक ड्रेस घातला होता. छोट्या अनायराला स्टेजवर पाहून प्रेक्षकांनी देखील टाळ्या वाजवत तिचे स्वागत केले. कपिल शर्मासोबत वॉक करताना अनायराने प्रेक्षकांकडे पाहत सुदर फ्लॅक किस देखील दिला.
View this post on Instagram
मदर्स डेच्या निमित्ताने या शोचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईत अनेक सेलिब्रिटींच्या उपस्थितीत हा शो पार पडला. अभिनेता आदित्य सील, अनुष्का रंजन, आकांक्षा रंजन, भारती सिंह, अपारशक्ती खुराना आणि निया शर्मा असे अनेक कलाकार यावेळी उपस्थित होते.