Mobile Recharge Plan – 28 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या दोन प्लॅनमध्ये ग्राहकांना एका वर्षासाठी Disney + Hotstar ची फ्री सब्स्क्रिप्शन मिळते. तुम्हालाही मनोरंजनाची आवड असेल, तर हा प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. OTT सबस्क्रिप्शन व्यतिरिक्त, या दोन्ही प्लॅनमध्ये तुम्हाला सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग, एसएमएस आणि डेटा फायदे देखील मिळतात. या दोन्ही प्लॅनबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया…
पहिला – Viचा 601 रुपयांचा प्रीपेड प्लॅन –
Vodafone Idea चा Rs 601 प्रीपेड प्लॅन फक्त 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. परंतु यामध्ये ग्राहकांना 1 वर्षासाठी Disney + Hotstar मोबाईलचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. या प्लॅनमध्ये, ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग, दररोज 3GB डेटासह 16GB अतिरिक्त डेटा आणि दररोज 100 SMS मिळतात. डेटा कोटा संपल्यानंतरही 64Kbps स्पीडने इंटरनेट वापरता येते. प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या अतिरिक्त फायद्यांमध्ये Binge All Night, Weekend Data Rollover, Vi Movies & TV आणि Data Delight सारखे फायदे समाविष्ट आहेत.
दुसरा – जिओचा 598 रुपयांचा प्रीपेड प्लॅन –
रिलायन्स जिओचा 598 रुपयांचा प्रीपेड प्लॅन देखील 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना डिस्ने + हॉटस्टार मोबाईलचे 1 वर्षासाठी मोफत सबस्क्रिप्शन मिळते. या प्लॅनमध्ये ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग, दररोज 2GB डेटा आणि दररोज 100 SMS मिळतात. डेटा कोटा संपल्यानंतरही 64Kbps स्पीडने इंटरनेट वापरता येते. प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या अतिरिक्त फायद्यांमध्ये डिस्ने प्लस हॉटस्टार व्यतिरिक्त Jio TV, Jio Simena आणि Jio Cloud चे सदस्यत्व समाविष्ट आहे. जर Jio चे 5G नेटवर्क तुमच्या परिसरात लाइव्ह असेल आणि तुम्ही 5G फोन वापरत असाल, तर तुम्ही अमर्यादित 5G डेटा ऑफरचा लाभ घेऊ शकता.