सातारा (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सहा तालुक्यातील २० जणांचा करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आल्याची माहिती मंगळवारी रात्री दहा वाजता देण्यात आली. त्यामुळे आज दिवसभरात २८ करोनाबाधितांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या आता १६६ झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील जावळी, खंडाळा, खटाव, पाटण, कराड आणि सातारा या तालुक्यांतील प्रवास करून आलेले आणि काही बाधितांच्या निकट सहवासातील अशा २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
तसेच बनपुरी येथील क्वारंटाइनमध्ये रविवारी अचानक मृत्यू झालेल्या महिलेचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.