पुण्यात चोवीस तासांत 279 करोना पॉझिटिव्ह; 11 जणांचा मृत्यू

पुणे – शहरात गेल्या चोवीस तासांत नव्या 279 करोना बाधितांची नोंद झाली. तर, 11 जणांचा मृत्यु झाला. त्यातील तीन रुग्ण पुण्याबाहेरील आहेत.

 

 

शहरात सध्या दररोज समोर येणाऱ्या नव्या करोना बाधितांची संख्या तीनशेपेक्षा कमी झाली आहे. मंगळवारच्या आकडेवारीनुसार शहरात करोनाची एकूण पॉझिटिव्ह संख्या 1 लाख 72 हजार 559 झाली असून, 1 लाख 62 हजार 979 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.

 

बाधितांमधील 5,070 जण ऍक्टिव्ह असून, त्यातील 412 क्रिटिकल आहेत. 247 जणांना व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

 

शहरात एकूण 4510 जणांचा मृत्यू झाला असून, मंगळवारी 2425 जणांची स्वॅब टेस्ट तपासणी करण्यात आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.