कोलकाता – येत्या 21 डिसेंबरला आकाशात शनी, मंगळ आणि गुरु ग्रहांची युती पहायला मिळणार आहे. शनी आणि गुरू हे दोन्ही ग्रह दर 20 वर्षांनी एकमेकांच्या जवळ येतात, हे दोन्ही ग्रह यापूर्वी 1623 मध्ये इतक्या जवळ आले होते.
यंदा मात्र 21 डिसेंबरला या दोन्ही ग्रहातले अंतर गेल्या आठशे वर्षांतले सर्वात कमी अंतर असणार आहे, असे एम.पी. बिर्ला प्लॅनेटेरियमचे संचालक देबी प्रसाद दुआरी यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
येत्या 23 तारखेपर्यंत दररोज सूर्यास्तानंतर तासभर पश्चिम क्षितीजावर हे ग्रह पाहता येणार आहेत. तेंव्हा या दोन्ही ग्रहांमधील अंतर 735 दशलक्ष किलोमीटर इतके असेल. त्यानंतर 15 मार्च रोजी हे शनि आणि गुरू एकमेकांच्या जवळ आलेले दिसतील.