Buldhana Bus Accident : बुलढाणा – समृद्धी महामार्गावर बुलढाण्यात प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बसने पेट घेतल्याने या प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांना ओळखणे कठीण झाले आहे.
अशात पोलिसांसमोर अपघातग्रस्त बसमधील मृत प्रवाशांची ओळख पटवण्याचं मोठं आव्हान आहे. ओळख पटवीण्यासाठी डीएनए टेस्ट शिवाय पर्याय नसल्याचे पोलीस यंत्रणेचे म्हणणे आहे. ही बस नागपूरहून निघाल्यामुळे खाजगी बस बुकिंग पॉईंट वरून ऑफिस मधून मृतांची नावं मिळण्यासाठी पोलीस यंत्रणा व प्रशासन प्रयत्न करत आहे आहे.
दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळील समृद्धी महामार्गावरुन ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. यादरम्यान मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. विदर्भ ट्रॅव्हल्सची MH 29 BE – 1819 क्रमांकाची ही बस नागपूरहून पुण्याकडे जात होती.
नेमका अपघात कसा घडला
प्रवासी बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. खांबाला धडकून उजव्या बाजूच्या संरक्षक कठड्यावर आदळलेली बस आधी डावीकडे पलटी झाली, नंतर काही क्षणातच तिने पेट घेतला. या बसमध्ये नागपूर, वर्धा आणि यवतमाळ येथील प्रवासी होती. विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस होती. बस सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या दुभाजकाला धडकली आणि बसने पेट घेतला. या घटनेत २५ प्रवाशांचा मृत्यू झाला.