लोणी काळभोर -हवेली तालुक्यातील लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, उरुळी कांचन, थेऊर, आळंदी म्हातोबा व सोरतापवाडी या सहा गावांच्या हद्दीत शनिवारी (दि. 8) 24 नवीन बाधित रुग्ण आढळले आहेत.
कदमवाकवस्ती 9, लोणी काळभोर 5, उरुळी कांचन 5, थेऊर 3, आळंदी म्हातोबाची 1 व सोरतापवाडी 1 या सहा ग्रामपंचायत हद्दीत 24 नवीन रुग्ण आढळले आहेत. पूर्व हवेलीत मात्र करोनाचा उद्रेक पूर्वीप्रमाणे सुरूच आहे.
लोणी काळभोर, उरुळी कांचन, कुंजीरवाडी, थेऊर, कदमवाकवस्ती, आळंदी म्हातोबाची व सोरतापवाडी हद्दीतील बाधितांची संख्या 400 च्यावर पोहोचली आहे.
तर वरील 8 ग्रामपंचायत हद्दीत सध्या शंभरहून अधिक रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. मागील बारा दिवसांच्या कालावधीत 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.