गेल्या काही वर्षात आयसीसीने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये केलेले बदल, कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची सुरुवात आणि काही रोमांचक सामन्यांमुळे यंदाच्या वर्षात कसोटी क्रिकेट सर्वाधिक लोकप्रियता मिळाली.
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या हंगामत न्यूझीलंडने बाजी मारल्यानंतर. या स्पर्धेचा दुसरा हंगाम सुरु झाला आहे. यामध्ये आतापर्यंत झालेल्या काही सामन्यांमध्ये अनेक खेळाडूंनी दमदार कामगिरी केलेली आहे. याच पार्श्वभूमिवर 2021 मध्ये सर्वोत्तम खेळ करणार्या खेळाडूंवच्या कामगिरीवर या लेखातून प्रकाश टाकणार आहोत.
1. रविचंद्रन अश्विन, भारत (52 बळी)
कसोटी क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमावारीत दुसर्या स्थानी असलेल्या रविचंद्रन अश्विनने 2021 मध्ये सर्वाधिक बळी घेतले आहेत. त्याने आठ सामन्यांमध्ये 16.23 च्या सरासरीने 52 फलंदाजांची शिकार केली. तर तीन वेळा एका डावात 5 बळी मिळवण्याची कामगिरी केली. भारताने केलेल्या इंग्लंड दौर्यात एकही सामना खेळायला न मिळून देखिल अश्विन यंदाच्या वर्षी सर्वाधिक बळी मिळवणार गोलंदाज ठरला आहे.
नुकतेच न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीदरम्यान, तो हरभजन सिंगला मागे टाकून कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा तिसरा गोलंदाज बनला. अश्विनने 81 कसोटी सामन्यात 24.12 च्या सरासरीने 427 बळी घेतले आहेत.
2. शाहीन आफ्रिदी, पाकिस्तान (47 बळी)
आयसीसी कसोटी क्रमवारीत तिसर्या क्रमांकाचा गोलंदाज असलेल्या शाहीन आफ्रिदीसाठी यंदाचे वर्ष खूप लाभदायक ठरले. त्याने नऊ कसोटी सामन्यांमध्ये 17.06 च्या सरासरीने 47 बळी घेतले. तर एक डावात तीन वेळा पाच बळी मिळवले. या वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक घेण्यार्या गोलंदाजांच्या यादीत आफ्रिदीने दुसरे स्थान पटकावले आहे.
या 21 वर्षीय गोलंदाजाची कसोटी कारकीर्द केवळ 21 सामन्यांची आहे. या वर्षी त्याने बरीच सुधारणा केली. 2020 च्या शेवटी, आफ्रिदी 481 रेटिंग गुणांसह गोलंदाजांच्या क्रमवारीत 32 व्या स्थानावर होता. त्याने यावर्षी आपल्या खात्यात 822 गुण जमा करत सर्वोच्च क्रमवारी गाठली.
3. हसन अली, पाकिस्तान (41 बळी)
टी20 विश्वचषकातील अपयश मागे सोडत पाकिस्तानच्या हसन अलीने नोव्हेंबरमध्ये बांग्लादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 5 बळी घेत, एका कॅलेंडर वर्षात कसोटीमध्ये 5 वेळा 5 बळी मिळवण्याचा विक्रम केला.
पाकिस्तानसाठी 2021 मध्ये 8 कसोटी सामने खेळणार्या हसन अलीने शाहीन आफ्रिदीनंतर 16.07 च्या सरासरीने दुसर्या क्रमांकाचे सर्वाधिक 41 बळी मिळवले आहेत.
पाकिस्तानने यावर्षी खेळलेल्या 4 पैकी 2 कसोटी मालिकेत तो सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. हसन अली हा झिम्बाब्वेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 14 बळी घेतले. तर, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतही तो सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता, त्याने 2 कसोटीत 12 बळी घेतले होते.