बामणोली- कास परिसरात कारगावजवळ 2 अस्वलांच्या हल्ल्यात 2 जण जखमी झाले. शंकर दगडू जाणकार (रा. धावली ता.सातारा) व संतोष लक्ष्मण कोकरे (रा. झुंगटी ता सातारा) येथील रहिवासी असून कारगाव येथे जात असताना दि. 25 नोव्हेंबर रोजी रात्री 12.00 च्या सुमारास अस्वलांनी हल्ला केला.
प्रसंगावधान दाखवून कास पठार कार्यकारी समितीच्या टीमने तातडीने जखमी व्यक्तीना शासकीय रुग्णालयात सातारा येथे पोचवले. सध्या शंकर दगडू जाणकर व संतोष लक्ष्मण कोकरे यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.