अपक्ष आमदार विनोद आगरवाल आणि महेश बलदी यांचा भाजपला पाठिंबा

मुंबई – सध्या महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग मिळाल्याचे पहायला मिळत आहे. शिवसेना-भाजपच्या सत्तास्थापनेसाठी वाटाघाटी सुरू आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना-भाजपमध्ये चांगलीच चुरस पहायला मिळत आहे. आज मुंबईत गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद आगरवाल आणि उरणचे अपक्ष आमदार महेश बलदी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे.

विविध आमदार शिवसेना आणि भाजपला समर्थन देत आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये सत्तास्थापनेसाठी रस्सीखेच सूरू असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी देखील आमदार रवी राणा आणि गीता जैन यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे पक्षीय बलाबलमध्ये सध्या भापपच पारडे जड असल्याचे दिसून येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.