मंचर -भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत आंबेगाव-शिरुर मतदारसंघातील विकासकामांसाठी 2 कोटी रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
शिनोली-मागासवर्गीय वस्ती येथे संरक्षक भिंत बांधणे, अवसरी खुर्द येथील खालची वेस ते बौध्दवस्ती रस्ता, मलठण रस्ता ते दुडेवाडी भिल्लवस्ती रस्ता, बाभुळसर खुर्द येथे अण्णा भाऊ साठे नगर येथे अंतर्गत गटार, कवठे रस्ता ते कवठे येमाई हरिजन वस्ती रस्ता, खंडाळे येथे भिल्ल वस्ती ते खंडोबा मंदिर रस्ता, शिनोली मागासवर्गीय वस्तीतील सामाजिक सभागृहाची दुरुस्ती आदी कामांसाठी प्रत्येकी 10 लाख, गिरवली-चर्मकार वस्ती (भैरवनाथ मंदिर) रस्ता, निगडाळे येथे मागासवर्गीय वस्ती रस्ता, प्रत्येकी 8 लाख,
चास इंदिरानगर येथील बौद्धवस्तीमधील सार्वजनिक चावडी सुधारणा, टाकळीहाजी येथे शिरूर रस्ता ते भिल्लवस्ती रस्ता, पाटण-साकेरी येथे नवबौद्धवस्ती रस्ता, गावडेवाडी येथे फुलवडेवस्ती रस्ता कॉंक्रिट, शिंगवे येथील सोनवणेवस्ती क्र.2 रस्ता, थुगाव येथे मागासवर्गीयवस्ती रस्ता, पिंपळगाव तर्फे महाळुंगे येथे चर्मकारवस्ती रस्ता, केंदुर येथे हरिजनवस्ती अंतर्गत रस्ता कामासांठी प्रत्येकी 5 लाख, निरगुडसर गावठाण येथे चर्मकारवस्ती रस्ता कॉंक्रीट करणे ,महाळुंगे पडवळ येथील इंदिरानगर येथे समाजमंदिर सुधारणा, आदी कामांसाठी निधी मंजूर झाला आहे.