मंचर- 2020-21 या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील 18 रस्त्यांच्या कामांसाठी 10 कोटी 52 लाख रुपये निधी मंजूर झालेला आहेत, त्यामुळे तेथील रस्ते चकाचक होणार असल्याची माहिती राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
ग्रामपंचायती व ग्रामस्थांच्या मागणीनुसार कामांचा पाठपुरावा करण्यात आला होता. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रस्त्याच्या कामांना सुरुवात होणार आहे. आदिवासी भागातील कामे – डोण ते हातविज मजबुतीकरण व डांबरीकण करणे – 1 कोटी 20 लाख, प्रमुख जिल्हा मार्ग – 63 ते उंबरवाडी रस्ता – 1 कोटी 60 लाख, तेरुंगुण ते वनदेव रस्ता – 40 लाख, ढगेवाडी ते शिंदेवाडी रस्ता – 80 लाख, तळेघर ते जांभोरी रस्ता – 80 लाख , प्रजीमा-6 ते लेभेवाडी जोडरस्ता – 4 लाख रुपये, पोखरी ते साबळेवाडी रस्ता – 90 लाख, माळीण गोफणेवस्ती ते लेंबेवस्ती रस्ता – 60 लाख, कुभेवाडी ते ढवळेवाडी रस्ता – 40 लाख, प्रजीमा-165 ते कोंढरे रस्ता – 40 लाख, भैरवनाथ मंदिर चपटेवाडी ते धारेश्वरवस्ती चिंचेचा ओढा रस्ता – 40 लाख, कानसे मुक्ताई मंदिर कॅनोल रस्ता – 40 लाख, रामा – 112 ते गाडेवाडी, उंडेवाडी ते आश्रमशाळा रस्ता – 80 लाख, जांभोरी रस्ता ते तळेघर म्हातारदरी रस्ता – 40 लाख, जांभोरी काळवाडी नं. 1 ते काळवाडी नं.1 ते काळवाडी नं. 2 रस्ता – 40 लाख, मेनुंबरवाडी ते बांगलेवाडी रस्ता – 40 लाख, चिखली इस्टेवाडी ते डोंगरहळी रस्ता – 28 लाख, लांडेवाडी ते पिंपळगाव रस्ता -30 लाख रुपये.