नवी दिल्ली – करोना विषाणूंच्या सावटाखाली असलेल्या देशवांसियाच्या आरोग्याला महत्व देत इंडियन प्रीमीअर लीग (आयपीएल) स्पर्धा अखेर पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही स्पर्धा येत्या 15 एप्रिलपासून नव्या वेळापत्रकानुसार खेळवली जाणार आहे. तसेच यासोबत भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय सामन्यांची मालिकाही रद्द करण्यात आल्याचे भारतीय नियामक मंडळाने जाहीर केले आहे.
शुक्रवारी राजधानीत याबाबत झालेल्या बैठकीत आर्थिक फायद्यापेक्षा जनतेचे आरोग्य जास्त महत्वाचे असल्याचे सांगत येत्या 29 पासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेच्या कार्यक्रमात बदल केला व स्पर्धेसाठी 15 एप्रिलनंतरचा कालावधी ठरविण्यात आला आहे. या निर्णयाची कल्पना स्पर्धेतील सर्व संघ मालकांना देण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
?Announcement?: #VIVOIPL suspended till 15th April 2020 as a precautionary measure against the ongoing Novel Corona Virus (COVID-19) situation.
More details ➡️ https://t.co/hR0R2HTgGg pic.twitter.com/azpqMPYtoL
— IndianPremierLeague (@IPL) March 13, 2020
दरम्यान, करोनाचा प्रसार चीनसह जगातील जवळपास 100 देशांमध्ये झाला असून भारतातही याचा विळखा वाढत आहे. आजपर्यंत जवळपास 80 रूग्ण बाधीत झाल्याचे समोर आले आहे. यामुळे केंद्र सरकारने सगळ्या देशांतून येणाऱ्यांचे व्हिसा 15 एप्रिलपर्यत रद्द केले आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य तसेच आयपीएलचे समभागधारक तसेच करोनाचा आणखी प्रसार होण्याची भीती हे सर्व पाहता आम्ही ही स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.