हिंजवडी, (वार्ताहर) – मुळशी तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या माण गावाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीनुसार माण ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीतून 16 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन ग्रामपंचायत पदाधिकार्यांच्या हस्ते झाले.
गावातील माणदेवी मंदिर व स्मशानभूमी परिसर सुधारणा, अंतर्गत कॉक्रीट रस्ते, भूमिगत ड्रेनेजलाइन, पथदिवे तसेच एमआयडीसीकडून मिळणार्या पाण्यसाठी टाकी बांधणे आशा विविध विकासकामांचा यांतर्गत समावेश आहे.
या वेळी माणच्या सरपंच अर्चना आढाव, उपसरपंच शशिकांत धुमाळ, ग्रामविकास अधिकारी मदन शेलार यांच्यासह मुळशी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष व विद्यमान सदस्य संदीप साठे, रवी बोडके, पंडित गवारे, प्रशांत पारखी, प्रदीप पारखी, विजय भोसले, देविदास सावंत, छाया ओझरकर, शुभांगी भोसले, रुपाली बोडके, अरुणा लोखंडे पदाधिकार्यांच्या हस्ते या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उपाध्यक्ष अमृता हिंगडे, माजी ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब कोळी, माजी तंटामुक्ती अध्यक्ष रामभाऊ बोडके, युवा उद्योजक सचिन आढाव, संध्या भोसले, पोलीस पाटील जितेंद्र भोसले, सामाजिक कार्यकर्ते दीपक गवारी व संदीप पारखी उपस्थित होते.
गेल्या पाच दहा वर्षांत माणमध्ये कोट्यवधी रुपयांच्या ग्रामनिधीतून महत्त्वपूर्ण कामे मार्गी लागली आहेत. जिल्ह्यात कुठे नसतील असे अनेक प्रकल्प व योजना आम्ही राबविल्या आहेत. त्यामुळेच विकासाचे मॉडेल म्हणून माण गावचा सर्वत्र सन्मान होतो. परंतु गावात राहिलेली काही प्रलंबित कामे सर्व सहकार्यांच्या मदतीने पुढील काळात मार्गी लावण्याचा आमचा संकल्प आहे. याकरिता 16 कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. – अर्चना आढाव, सरपंच, माण.