नवी दिल्ली – ग्वाल्हेर किल्ल्यावरील ‘ताल दरबार’ मध्ये १५०० हून अधिक वादकांनी एकाच वेळी तबला वादन सादर करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केले आहे. या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, विधानसभा अध्यक्ष नरेंद्र सिंह तोमर आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया देखील उपस्थित होते.
या उपक्रमाविषयी आनंद व्यक्त करताना मुख्यमंत्री यादव यांनी २५ डिसेंबर हा दिवस ‘तबला दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा केली.ते म्हणाले की, भारतातील संगीताचा इतिहास हा ५००० वर्षांहून जुना मानला जातो. संगीत आणि ग्वाल्हेर कधीही वेगळे होऊ शकत नाहीत,असे ते म्हणाले.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे अॅडज्युडिकेटर, स्वप्नील डांगरीकर यांनी सांगितले की, इतक्या मोठ्या संख्येतील वादक एकत्र टेबलवर परफॉर्म करण्याचा असे यापूर्वी कोणतेही रेकॉर्ड नव्हते यासाठी आम्ही काही किमान नियम आणि आवश्यकता ठेवल्या होत्या. त्यांची कामगिरी चांगली होती आणि ते आकड्यांच्या बाबतीतही यशस्वी झाले आहेत. मला हे सांगताना खूप आनंद होत आहे की त्यांनी एक नवा विक्रम केला आहे.
या कार्यक्रमाचे संयोजक असलेले सलीम म्हणाले की, कार्यक्रमाची थीम ‘वंदे मातरम्’ होती आणि राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बहुतेक मध्य प्रदेशातील सुमारे 1500 विद्यार्थी यात सहभागी झाले होते.