बालकलाकार रुहानिका धवनने मुंबईत घर विकत घेतले आहे. याची माहिती तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे. रुहानिकाने घराचे काही फोटो शेअर करत खूप भावूक कॅप्शनही लिहिले आहे.
नवीन घरात रुहानिका आपल्या कुटुंबासोबत खूप आनंदी दिसत होती. आपल्या यशाचे श्रेय ती आईला देताना दिसली. यापुढे ती अजून मेहनत करेल आणि तिची सर्व स्वप्ने अशीच हळूहळू पूर्ण करेल असे ती म्हणताना दिसली.
स्टार प्लसच्या लोकप्रिय टीव्ही शो ‘ये है मोहब्बतें’मध्ये दिसणारी रुहानिका धवन उर्फ ’छोटी रुही’ हिने आपल्या अभिनयाने प्रत्येक घरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. याच लोकप्रियतेच्या जोरावर आज ती तिची सर्व स्वप्ने पूर्ण करत आहे. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी रुहानिका मुंबईत स्वतःचा ३ बीएचके फ्लॅटही विकत घेतला आहे.
रुहानिका म्हणते की, ती जरी उत्साहित असली तरी तिला नवीन घरात शिफ्ट व्हायचे नाही. आता मी बोर्डाच्या परीक्षेवर लक्ष केंद्रित करणार आहेआणि चांगले गुण मिळवून यश मिळवेल.’ अशी इच्छा तिने बोलून दाखवली आहे.